Home क्राईम बियर घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात बॉक्स घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

बियर घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात बॉक्स घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

अहमदनगर दि.१६ जुलै

नगर – औरंगाबाद महामार्गावरील पांढरी पूल या ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे.यामध्ये एक ट्रक नगर वरून औरंगाबाद कडे बियरचे बॉक्स घेऊन निघाला होता.तर दुसरा नगरच्या दिशेने येत होता.

अपघातानंतर बियर चे खोके घेण्यासाठी अनेक नागरिकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या वेळेस अंदाज चुकल्याने बियर घेऊन जाणारा ट्रक चुकीच्या लेनमध्ये घुसून हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये दोन्ही ट्रक चालकांना किरकोळ दुखापत झाली असून मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दोन्ही गाड्या बाजूला काढून रस्ता वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

बातमी आत्ता अपलोड झाली आहे रिफ्रेश करत राहा पुढील अपडेट मिळतील 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version