Homeक्राईममुकुंद नगरच्या अंडा गँगच्या मोहरक्यावर अखेर गुन्हा दाखल .... बंटी डापसे यांना...

मुकुंद नगरच्या अंडा गँगच्या मोहरक्यावर अखेर गुन्हा दाखल …. बंटी डापसे यांना दिली होती धमकी

advertisement

अहमदनगर दि.२१ जानेवारी

अहमदनगर शहरातील मंगल गेट परिसरात असलेल्या जय भगवान डेअरी वर येऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बाबा खान याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना 29 डिसेंबर 2022 रोजी घडली होती त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण ऊर्फ (बंटी) सुनिल डापसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बंटी डापसे यांचे मंगलगेट भागामध्ये जय भगवान नावाची दूध डेअरी असून या डेरीवर बंटी डापसे यांचे वडील डेअरीचे काम पाहत असतात 29 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बंटी डापसे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात इसमाने फोन करून  बंटी डापसे यांना तुमच्याशी बोलायचं आहे तू कुठे आहेस याचा पत्ता दे असे विचारल्यानंतर बंटी डापसे यांनी सांगितले की मी माझ्या कुटुंबासह बाहेर असल्यामुळे सध्या भेटू शकत नाही. त्यानंतर काही वेळाने काही लोक तलवारी, बंदुक, लाकडी दांडके, रॉड घेऊन बंटी डापसे यांच्या जय भगवान डेअरी वर गेले होते. त्यावेळी बंटी डापसे यांचे वडील त्या ठिकाणी उपस्थित बंटी डापसे यांच्या वडिलांना आलेल्या लोकांनी बंटी कुठे आहे असे विचारले मात्र बंटी डापसे यांच्या वडिलांनी काहीच उत्तर दिल्याने ते निघून गेले.

बंटी डापसे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यामुळे त्यांना सतत जीवे मारण्याचा धमक्या दिल्या जात आहेत मुकुंद नगर भागातील अंडा गॅंग या या टोळीचा प्रमुख बाबा खान याने आणि त्याच्या साथीदारांनी दुकानावर येऊन धमकी देऊन तसेच फोनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बंटी डापसे यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली आहे बंटी डापसे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी बाबा खान यांच्या विरोधात भादवी कलम 504 506 शस्त्र अधिनियम 1959 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार घडला तेव्हा बंटी डापसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले होते त्यानंतर पोलिसांनी आज गुन्हा दाखल करून घेतला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular