Homeक्राईमतोफखाना पोलीस ॲक्शनमोड मध्ये रात्री अकरा वाजता अघोषित संचारबंदी... सुरुवात विनंतीने नंतर...

तोफखाना पोलीस ॲक्शनमोड मध्ये रात्री अकरा वाजता अघोषित संचारबंदी… सुरुवात विनंतीने नंतर कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

advertisement

अहमदनगर २१जानेवारी
नगर शहरात गेल्या काही दिवसापासून तणावपूर्ण वातावरण असून छोट्या-मोठ्या कारणांमुळे शहरात दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या दोन गटातील दगडफेकीनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शहरातील गुंडागर्दी आणि वातावरण निवळण्यासाठी तोफखाना पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून शुक्रवारी रात्री तोफखाना पोलिसांनी संपूर्ण तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेल्स आणि दुकाने बंद केली होती. शनिवारपासून उशिरा पर्यंत सुरू असणारे सर्व हॉटेल खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, पान टपरी आणि इतर दुकाने अकरा वाजता बंद करावेत अशी तंबी तोफखाना पोलिसांनी दुकानदारांना दिली असून शुक्रवारी पोलिसांनी सर्व हॉटेल धारक आणि दुकानदारांना विनंती केली असून जर पुढील काळात या नियमाचे उल्लंघन कोणी करत असेल तर तोफखाना पोलीस त्याच्यावर कायदेशीर ॲक्शन घेण्याच्या मनस्थितीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात टवाळक्या करणाऱ्या टवाळखोरांना सुद्धा पोलिसांनी समज दिली असून इथून पुढे रात्री उशिरा दिसल्यास कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार असल्याचे ही समज देण्यात आली आहे. त्यामुळे आता तोफखाना पोलीस ऍक्शन मोडवर आले असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन तोफखाना पोलिसांनी केले आहे.

शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या दोन पथकाने उशिरा सुरू असणाऱ्या गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी चौक,पाईपलाईन रोड, चितळे रोड, राज चेंबर,कोठला परिसर, सर्जेपुरा,सिव्हिल हॉस्पिटल परिसर लाल टाकी परिसर ,दिल्ली गेट नालेगाव, या ठिकाणी जाऊन सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन करून अकरा वाजताच दुकाने बंद करण्याची विनंती केली आहे. तसेच इथून पुढे ११ नंतर दुकाने उघडे ठेवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्यासह सहह्याक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे,सहह्याक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह तोफखाना पोलीस स्टेशन मधील गुन्हेशोधपथकाचे कर्मचारी आणि अंमलदार या मोहिमेत सामील झाले होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular