Homeक्राईमअबब एक कोटीची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला पकडला महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई

अबब एक कोटीची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला पकडला महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई

advertisement

अहमदनगर दि.४ नोव्हेंबर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभागामधील एका सहाय्यक अभियंता सह तत्कालीन उपविभागीय अभियंता विरोधात नगर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक कोटी लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल केली असून यामधील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला पन्नास लाख रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

अमित किशोर गायकवाड वय 32 वर्षे व्यवसाय नोकरी पद सहा.अभियंता वर्ग 2 महाराष्ट्र रा.प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर जि अहमदनगर मुळ रा. चिंचोली ता.राहुरी जि अ नगर .गणेश वाघ तत्कालीन उपविभागींय अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग अ नगर अशी आरोपींची नावे आहेत.

यातील फिर्यादीत याचे मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस यातुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अ नगर च्या औद्योगिक वसाहती मध्ये 1000 एमएम व्यासाची लोखंडी 1,57,85,995/- रुपये तसेच सदर असे एकुण 2,66,99,244/- रु मला मिळावे म्हणुन सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागींय अभियंता गणेश वाघ यांच्या मागील तारखेचे आउट वर्ड करुन त्यावर वाघ यांच्या सह्या घेवुन सदरचे देयक त्यांच्या पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड साहेब यांनी स्वतःसाठी तसेच गणश वाघ यांच्या करीता आरोपीत यांनी या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन 1,00,00,000/- रु लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले.तसेच सदर मागणी केलेली 1,00,00,000 /- रु लाचेची रक्कम गायकवाड यांनी स्वतःसाठी तसेच गणेश वाघ तत्कालीन उपविभागींय अभियंता महाराष्ट्र औद्योकिक विकास महामंडळ उपविभाग अ नगर यांचेकरीता दि.03/11/2023 रोजी 14/12 वाजेचे सुमारास अ नगर ते संभाजीनगर रोडलगत आनंद सुपर मार्केट बिंल्डिंग च्या बाजुला मोकळ्या पटांगणात अहमदनगर या ठिकाणी इनोव्हा वाहन क्र एम एच 20 सी आर 7777 या वाहनात पंच,साक्षीदारा समक्ष स्विकारली आहे. गणेश वाघ यांनी श्री गायकवाड यांच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिले आहे.म्हणुन आरोपीत यांनी भ्रष्टाचार व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशाच्या स्वरुपात लाभ मिळविण्याची व्यवस्था करुन गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले आहे वैगरे फिर्यादी वरुन गुन्हा रजि. दाखल केला आहे.

ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली होती दुपारपासूनच या कारवाईबाबत अहमदनगर शहरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये चर्चा सुरू होती मात्र रात्री उशिरापर्यंत नेमका अधिकारी कोणचा पकडला याबद्दल खात्री नसल्याने विविध खात्यांचे अधिकारी असल्याचे चर्चा जोरात सुरू होतील लाच लुचपत विभागाच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर या नगरमध्ये तळ ठोकून होत्या त्यांच्या पथकाने आज आपला रचून एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेताना महाराष्ट्रातील पहिलीच कामगिरी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular