अहमदनगर दि.३ नोव्हेंबर
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये असलेल्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र त्याबाबत अध्यापही शहानिशा झालेली नाही. मात्र हा छापा अत्यंत गोपनीय ठेवला असल्यामुळे शहरात सर्वच शासकीय कार्यालया मध्ये एक चर्चेचा विषय झाला आहे. नेमका छापा कोणी केला याबाबतही अद्याप माहिती समोर आली नसली तरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे या छाप्याचे गांभीर्य वाढले असून याबाबत आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय नेमकी कारवाई कुठे आणि कोणावर झाली हे समजेल मात्र आज दुपारपासून अहमदनगर शहरातील सर्वच शासकीय कार्यालय मध्ये याची चर्चा जोरात सुरू आहे.