Homeक्राईमअंकुश चत्तर खून प्रकरणातील फरारी "त्या" आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

अंकुश चत्तर खून प्रकरणातील फरारी “त्या” आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या …

advertisement

अहमदनगर दि.१९ जुलै
अंकुश चत्तर खून प्रकरणातील फरारी आरोपी राजू फुलारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून खून झाल्या पासून तो फरार होता.राजू फुलारी यानेच भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि त्याच्या साथीदारांना बोलून घेतले होते त्यानंतर हे हत्याकांड घडले होते.

पोलिसांच्या दोन ते तीन-टीम राजू फुलारी याला पकडण्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये गेल्या होत्या.अखेर तो राहुरी तालुक्यातील मनोरी येथे पोलिसांना सापडला असून तोफखाना पोलिसांनी घेतले आहे.त्याला मदत करणारा अरुण अशोक पवार याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सपोनि.नितीन रणदिवे, पो.उप.नि. समाधान सोळंके, पोहेकॉ.दत्तात्रय जपे, पो. हे सुनिल शिरसाठ, पोना.अविनाश वाकचौरे,अहमद इनामदार, वसिम पठाण, संदिप धामणे, पोकॉ सतिष त्रिभुवन, सचिन जगताप, शिरीष तरटे, संदिप गि-हे, सतिष भवर, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, गौतम सातपुते तसेच सायबर सेलचे नितिन शिंदे व राहुल गुंन्डु यांनी मोबाईलची तांत्रिक माहिती पुरवली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular