अहमदनगर दि.१८ जुलै
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून स्वर्गीय दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या छोट्या खाणी कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे उपस्थित होते.
नगर तालुक्याच्या राजकारणात हा भूकंप मानला जात असून दादा पाटील शेळके शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून त्यांनी नगर तालुक्यात अनोखी महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून रोखले होते त्यानंतर अंकुश शेळके यांचे काका प्रताप शेळके हे काँग्रेस च्या माध्यमातून आपला बालेकिल्ला लढवत असतानाच अंकुश शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे आगामी काळात पुन्हा एकदा काका पुतण्याचा सामना नगर तालुक्याच्या राजकारणात दिसू शकतो.