अहमदनगर दि.५ फेब्रुवारी
अहमदनगर नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याच्या अटकेत असलेला बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया, मनेष साठे आणि अनिल कोठरी याला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने माजी अध्यक्ष अशोक कटारिया गणेश साठे अनिल कोठारी यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्याला पाच तारखे पर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्याला आज न्यायालयात पुन्हा हजर केले. यावेळी पोलिसांनी तपासाची माहिती दिली. सरकारी पक्षाच्या वतीने मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला.तर आरोपींच्या वतीने एडवोकेट महेश तवले, एडवोकेट संजय दुशिंग,आणि संजय वालेकर यांनी बाजू मांडली
किती आरोपी पकडले जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलेल्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली का? नसेल लावली तर तुम्ही काय कारवाई केली. तुम्ही काय अँक्शन घेतली पोलिसांना न्यायालयाचा सवाल
प्रॉपर्टी जप्त केली का? तुमच्या कडे सल्ला देणारे
कोणी आहे का नाही, मोठा मासा पकडा त्याची प्रॉपर्टी जप्त करा गुन्ह्यातील १०५ लोकांच्या प्रॉपर्टी जप्त करा सातबारे काढा तहसीलची मदत घ्या ठेवीदारांचे पैसे तर मिळू द्या असेही कोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेला सुनावले
पोलिसांनी सांगितले आरोपींचे पासपोर्ट जप्त केले आहेत बाकी कारवाई सुरू आहे. मात्र आज तपासी अधिकारी आले नाहीत dysp खेडकर प्रभारी अधिकारी होते मात्र त्यांच्या जागी बदली होऊन दुसरे अधिकारी आल्याने dysp खेडकर आले न्यायालयात नव्हते.
नगर शहरातील शहर सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी जमिनीवर असलेला चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा हा न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेला हजर राहत नाही त्याच्यावर पोलीस अटकेची कारवाई का करत नाही अशी बाजू न्यायालयात ठेवीदारांच्या वतीने मांडण्यात आली.
आज आरोपींना न्यायालयात हजर करताना ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आरोपींचे नातेवाईकांनी न्यायालयात हजेरी लावली होती. मात्र आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही अपराधी भावना दिसून आली नाही.