HomeUncategorizedसुपे पारनेर रोड वरील शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त...सुप्यात सकाळी आठ पासून अतिक्रमण मोहीम...

सुपे पारनेर रोड वरील शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त…सुप्यात सकाळी आठ पासून अतिक्रमण मोहीम जोरात..

advertisement

अहमदनगर दि.२४ मे

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथे आज सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने सुपा गावातील अतिक्रमण काढण्यात येत असून शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे.यामुळे गावामध्ये एक तणावपूर्ण शांतता असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही कारवाई झाल्याने याबाबत ही कारवाई सूडबुद्धीने झाल्याची चर्चा सध्या सुपा गावात आहे.

सुपा पारनेर रोडवरील अनेक पक्की आणि पत्र्याची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून असून सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषा ही आखून दिली होती मात्र तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने ही मोहीम अतिक्रमण मोहीम राबवली आहे अशी माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांत अधिकारी गणेश राठोड यांनी दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular