HomeUncategorizedभर दुपारी दाट लोकवस्तीत चोरट्यांचा अठरा तोळे सोन्यावर डल्ला...

भर दुपारी दाट लोकवस्तीत चोरट्यांचा अठरा तोळे सोन्यावर डल्ला…

advertisement

अहमदनगर दि.२४ मे
अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या शनि चौक येथील स्वामी समर्थ मंदिरात जवळ असलेल्या एका घरामधून भर दुपारी 18 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

शुक्रवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही घटना शहराच्या मध्यवस्तीत घडली असून चोरट्यांनी जणू काही पोलिसांना एक आव्हान दिले आहे. भर दुपारी भरवस्तीत चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे घर मध्यवस्तीत असून आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. तरीसुद्धा चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करून पोलिसांसमोर एक मोठं आव्हान ठेवले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विशाल गांधी यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू आहे. मात्र सध्या घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular