Home राजकारण आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची” शिवसेने कडून पोस्टर रिलीज दसरा मेळावा होणारच

आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची” शिवसेने कडून पोस्टर रिलीज दसरा मेळावा होणारच

मुंबई दि.१८ सप्टेंबर:
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये मोठी घडामोड होत आहे महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता शिवसेने (Shiv Sena)मधून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने मिळून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबत आता वाद चांगलाच पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नवरात्र उत्सवानंतर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो मात्र हा मेळावा कोण घेणार यासाठी गेल्या काही दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात आहे.

कारण एकनाथ शिंदे गट हे सुद्धा आम्ही शिवसेनेचेच आहोत हे सांगत आहे. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा दसरा मेळावा घेण्यावर ठाम होते. त्यामुळे दसरा मेळावा कोण कोण घेणार आणि कोणत्या मैदानावर घेणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून होती .

 

आता शिवसेनेकडून या मेळाव्याचं पोस्टर रिलीज झालं आहे. यावर “आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची”, असं लिहिण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो या पोस्टरवर लावण्यात आले आहेत. सत्तांतरनंतर होणाऱ्या या मेळाव्यात विरोधीपक्ष भाजप आणि विशेषत: शिंदेगटावर तोफ डागली जाणार सर्वश्रृत आहे. आता फक्त उद्धव ठाकरे कोणत्या पद्धतीने बोलणार, कोणते शब्द वापरणार, हे पाहणं महत्वाचं आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version