Home Uncategorized राष्ट्रवादीचा बडा नेता बाळासाहेबांची शिवसेनेत… थेट शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती

राष्ट्रवादीचा बडा नेता बाळासाहेबांची शिवसेनेत… थेट शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती

अहमदनगर दि. 23 ऑक्टोबर

अहमदनगर जिल्ह्यातील मराठा आरक्षण अभ्यासक आणि मराठा आरक्षण चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका घेणारे संभाजी ब्रिगेड तसेच शिव प्रहार या संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध चळवळीत सहभाग घेऊन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून पक्षीय राजकारणात वाटचाल करणारे इंजिनीयर संजीव भोर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल ही खात्री असल्यामुळे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहोत” अशी प्रतिक्रिया संजीव भोर यांनी दिली. कायम टिकणारे मराठा आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक टप्पे हे सरकार लवकरच पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजीव भोर यांच्यावर शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, संजीव भोर यांच्या रुपानं एकनाथ शिंदे यांनी एकाच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील दुसरा मोठा नेता पक्षात आणला आहे. नुकताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ठाणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेत फुट पाडल्यानंतर पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version