Home Uncategorized भाजपाच्या नगरसेवकाचा भाऊ बाळासाहेबांची शिवसेना गटात

भाजपाच्या नगरसेवकाचा भाऊ बाळासाहेबांची शिवसेना गटात

अहमदनगर दिनांक 14 ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील शिंदे गटाची ताकद हळूहळू वाढत चालली असून नगर शहरात मध्यंतरी शिंदे गटाने भव्य दिव्य मेळावा घेऊन आपल्या समर्थकांची ताकद दाखवून दिली आहे अहमदनगर शहरातील अनेक शिवसैनिक हळूहळू आता एकनाथ शिंदे गटात सामील होतानाचा चित्र दिसत असून नगर शहरातील लोकांना परिसरातील रणजित परदेशी यांची बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व मुखमंत्री वैद्यकीय मदत निधी खासदार श्रीकांत शिंदे फौडेशनच्या अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे संपर्कप्रमुख सचिन जाधव शहराध्यक्ष दिलीप सातपुते तसेच बाबुशेठ टायरवाले भिंगारचे शहराध्यक्ष लाल बेंद्रे सचिन राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील काळात या पदाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याबाबत मोठे संपर्क अभियान राबवणार असल्याचं रणजीत परदेशी यांनी सांगितले आहे. रंजीत परदेशी हे तोफखाना परिसरात वास्तव्यास असून बोलेगाव परिसरातही त्यांचे मोठे पाठीराखे आहेत. प्रभाग क्रमांक नऊच्या पोटनिवडणुकीत त्यांचे भाऊ हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. या विजया मागे रणजीत परदेशी यांचे मोठे योगदान होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version