Home Uncategorized नगरमध्ये पकडले तीन बांगलादेशी बनावट कागदपत्रांसह वास्तव्य, एमआयडीसी पोलीस आणि मिलीटरी इन्टेलिजन्समुळे...

नगरमध्ये पकडले तीन बांगलादेशी बनावट कागदपत्रांसह वास्तव्य, एमआयडीसी पोलीस आणि मिलीटरी इन्टेलिजन्समुळे आला प्रकार उघडकीस..

अहिल्यानगर दिनांक 27 जून

चोरट्या मार्गाने भारतात प्रवेश करून नगरजवळील पोखर्डी शिवारातील खडी क्रेशरवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना सदन कमांड मिलेट्री इन्टेलिजन्स आणि एमआयडीसी पोलिसांनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व अन्य कागदपत्रांसह अटक केली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर मधील दक्षिणी कमांड मिलीटरी इंटेलिजेंस यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पोलिसांना माहिती देऊन कारवाई करण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार २६ जून रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोखर्डी गावाच्या शिवारात वारुळे वस्ती येथील खडी क्रेशरजवळ वास्तव्य करत असणाऱ्या ठिकाणी जाऊन एका खोलीत तीन संशयित इसम आढळून आले.

त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे जहांगिर अबुताहेर शेख (वय ३४, रा. चातपुर ठाणा, हजीगंज, बांगलादेश), हनीफ अब्दुल खलीद शेख (वय ४०, रा. खजोर खाली, शेमबाग, बांगलादेश), मुषर्रफ हवीय शेख (वय ४०, रा. चातपुर ठाणा, हनीगंज, यांगलादेश) अशी असल्याचे सांगितले, ते भारतात कोणत्याही व्हिजा अथवा परवानगीशिवाय आले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहेत. या – प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक मानिक चौधरी, पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंडे, सहाय्यक फौजदार राकेश खेडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजु सुद्रीक, पोलिस कॉन्स्टेवल किशोर जाधव, सुरज देशमुख, जयशिंग शिंदे, शेरकर,यांनी केली आहे.तसेच सदन कमांड मिलेट्री इन्टेलिजन्स अहिल्यानगर यांची मदत घेण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version