Home राज्य निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या मगच पुढं जावा या मोठ्या राजकीय नेत्याला कार्यकर्त्यांनी...

निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या मगच पुढं जावा या मोठ्या राजकीय नेत्याला कार्यकर्त्यांनी चांगलंच धरलं धारेवर

पंढरपूर दि.१६ जून
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने आज दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवलं होतं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.

‘पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यावर मी आहे. सांगोल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे,अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version