अहमदनगर दि २६ जूनअ
हमदनगर शहरात 20 जूनच्या मध्यरात्री खुनाचा थरार झाला होता.ओंकार घोलप आणि ओंकार भागानगरे यांनी गणेश हूच्चे याच्या सुरू असलेल्या अवैद्य धंद्याबाबतची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती.त्यानुसार कोतवाली पोलिसांनी गुटखा,दारू,जुगार अशा अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली होती. मात्र ही कारवाई ओंकार घोलप आणि ओंकार भागानगरे यांच्या अर्जामुळे झाली असल्याचा राग मनात धरून गणेश हुच्चे आणि त्याच्या साथीदारांनी वीस जून रोजी रात्री एक वाजता ओमकार घोलप ओंकार आणि त्यांचा तिसरा मित्र शुभम पडोळे यांना रात्रीच्या सुमारास बालिकाश्रम रोडवर गाठून तलवारीने वार केले या घटनेत ओंकार भागानगरे हा मयत झालाय तर पडोळे गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर तलवारीने वार करणारे गणेश हुच्चे नंदू बोराटे आणि संदीप गुडा फरार झाले होते यांना मदत करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर इतर आरोपींच्या शोधासाठी विविध पथके जिल्हा बाहेर रवाना झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश हुच्चे आणि नंदू बोराटे यांना पुणे येथूनताब्यात घेतले होते मात्र संदीप गूडा फरार होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह तोफखाना पोलिसांचे पथक संदीप गुडा याच्या मागावर होते अखेर तोफखाना पोलिसांना संदीप गुडा याचा ठावठिकाणा लागल्यावर तोफखाना पोलिसांनी त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.ओंकार भागानगरे यांच्या खून प्रकरणातील सर्व मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात सात आरोपी झाले आहेत.