HomeUncategorizedओंकार भगानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात ?

ओंकार भगानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात ?

advertisement

अहमदनगर दि २३ जून

अहमदनगर शहरात 20 जूनच्या मध्यरात्री खुनाचा थरार झाला होता.ओंकार घोलप आणि ओंकार भागानगरे यांनी गणेश हूच्चे याच्या सुरू असलेल्या अवैद्य धंद्याबाबतची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती.त्यानुसार कोतवाली पोलिसांनी गुटखा,दारू,जुगार अशा अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली होती. मात्र ही कारवाई ओंकार घोलप आणि ओंकार भागानगरे यांच्या अर्जामुळे झाली असल्याचा राग मनात धरून गणेश हुच्चे आणि त्याच्या साथीदारांनी वीस जून रोजी रात्री एक वाजता ओमकार घोलप ओंकार आणि त्यांचा तिसरा मित्र शुभम पडोळे यांना रात्रीच्या सुमारास बालिकाश्रम रोडवर गाठून तलवारीने वार केले या घटनेत ओंकार भागानगरे हा मयत झालाय तर पडोळे गंभीर जखमी झाला होता.

या घटनेनंतर तलवारीने वार करणारे गणेश हुच्चे नंदू बोराटे आणि संदीप गुडा फरार झाले होते यांना मदत करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर इतर आरोपींच्या शोधासाठी विविध पथके जिल्हा बाहेर रवाना झाले होते.

 


अहमदनगर शहरातील ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गणेश हुच्चे आणि नंदू बोराटे यांना पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती समजली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून या दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून ते पथक नगर कडे रवाना झाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular