Homeक्राईमएकाच दिवशी.. एकाच पोलीस ठाण्यात दोन सामूहिक अत्याचाराचे गुन्हे दाखल एका गुन्ह्यात...

एकाच दिवशी.. एकाच पोलीस ठाण्यात दोन सामूहिक अत्याचाराचे गुन्हे दाखल एका गुन्ह्यात नगर शहरातील तत्कालीन पोलीस निरीक्षकाचा समावेश

advertisement

अहमदनगर दि.२६ डिसेंबर

अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून दोन्ही गुन्ह्यात सामुहिक अत्याचार झाला असल्याच्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत.विशेष म्हणजे एका महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यात नगर शहारत काम केलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि त्याच्या मुलांची नावे फिर्यादीत टाकण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात 27 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शबनम उर्फ शमीन गफुर मोमिन ( रा .अंबिका नगर केडगाव ता जि अहमदनगर ) इम्रान शेख पुर्ण नाव माहित नाही (रा.मुकूंदनगर) शहानु शेख पुर्ण नाव माहित नाही( रा.बाराइमाम कोटला जि अहमदनगर) रिक्षा चालक अकरम उर्फ अरशद ( रा.झेंडीगेट अहमदनगर ) बाशीद मुक्तार खान( रा.लिंक रोड केडगाव ता जि अहमदनगर) आणि केडगाव मधील एक महिला अशा लोकांविरुद्ध भादवि कलम376ड,ब,323,504,506,34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची हकीकत अशी की अत्याचारित महिलेला या प्रकरणातील गुन्हे दाखल झालेल्या लोकांनी जीवे मारण्याची धमकी देऊन गोविंदपुरा भागातील काटवनात नेऊन मारहाण करून एका महिलेचा साह्याने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अशी फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात एका 28 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अफरोज हमिद शेख( रा सिव्हिल हॉसिपटल जवळ अहमदनगर ) विकास दौलतराव वाघ, संतोष दौलतराव वाघ,(सर्व रा. तपोवन रोड समर्थ टॉवर नाशिक) तसेच यात तीन महिलांचा समावेश असून यांच्याविरोधात भादवि कलम376ड,365,323,504, 34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी हकीकत अशी की गुन्हा दाखल झालेले विकास वाघ हे अहमदनगर शहरामध्ये कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते तसेच त्यांच्याबरोबर इतर गुन्हे दाखल झाले त्यांची मुलं आणि पत्नीसह मुलींचा समावेश असून या आधी या प्रकरणातील फिर्यादी आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. विकास वाघ यांच्या विरोधात अहमदनगर शहरात विविध पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 28 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्याची हकीकत अशी की यातील फिर्यादी महिलेने विकास वाघ यांच्या विरुद्ध या आधी गुन्हे दाखल केले आहेत त्याचाच राग मनात ठेवून फिर्यादी महिला जिल्हा न्यायालयाच्या समोरून जात असताना तिला विकास वाघ आणि त्याच्या सोबत गुन्हा दाखल झालेल्या लोकांनी बळजबरीने चार चाकी गाडीत बसून नेऊन तु आमच्या विरुदध दाखल केलेले गुन्हे मागे घे असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर फिर्यादीस जवळ असलेल्या काटवणात घेऊन जाऊन तेथे मारहाण करून सामूहिक अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन ने एकाच दिवशी दोन सामूहिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular