अहमदनगर दि.२५ डिसेंबर
अहमदनगर शहरात आलमगीर भागात आणि प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. २१ डिसेंबर रोजी भल्या पहाटे काळ्या रंगाच्या इनोव्हा मधून हेआयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक नगर शहरात दाखल झाले होते.
भल्या पहाटे मुंबई पासिंग असलेल्या काळ्या रंगाच्या गाड्यांच्या ताफा नगर शहारत दाखल झाल्या आणि शहरातील विविध ठिकाणी हा ताफा पोहचला सुरवातीला हा ताफा नेमका कोणाचा या बाबत चांगलीच उलट सुलट चर्चा सुरू होती.
प्रोफेसर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरी हे पथक पोहचले गेल्या पाच दिवसापासून आयकर विभागाचे पथक त्या व्यापाऱ्याची कसून चौकशी करत होते. अखेर पाच दिवसांनी म्हणजे 25 डिसेंबरला रात्री साडेसात वाजता सर्व सरकारी सोपस्कर करून या अधिकाऱ्यांनी त्या व्यापाऱ्याचे घर सोडले.