अहमदनगर दि. 10 जून
अहमदनगर शहरा लगत असलेल्या भिंगार शहर रविवारी बंदचा निर्णय अखंड हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
लव जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच शहरात औरंग्याची पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी बंदचे आवहान केले असल्याचं अखंड हिन्दू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.