Home शहर भिंगारची स्थापना आणि इतिहास.. भिंगारकरांनी अजूनही विचार करावा कारण त्यांना ही शेवटची...

भिंगारची स्थापना आणि इतिहास.. भिंगारकरांनी अजूनही विचार करावा कारण त्यांना ही शेवटची संधी असू शकते… महापालिकेच्या हद्दीत येऊन फुफाट्यात पडायचे की अजून वेगळा मार्ग स्वीकारायचा..

अहमदनगर दि.५ डिसेंबर

छावणी परिषद म्हणजे सैन्याच्या तुकडीचा तात्पुरती राहण्याचा भाग अहमदनगर छावणी मंडळ 1879 पूर्वी स्थापना झाली होती. 1889 मध्ये कॅन्टोन्मेंट कायदा कलम तेरा लागू करण्यात आला होता, जो ब्रिटिश भारतातील सर्व छावणींमध्ये वाढविला गेला होता , त्यात कॅन्टोन्मेंटमधील महानगरपालिकेच्या विविध कामकाज हाताळण्यासाठी छावणी प्राधिकरणाची स्थापना केली गेली. कॅन्टोन्मेंट मॅजिस्ट्रेट हे त्याचे सदस्य सचिव आणि कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते कॅन्टोन्मेंट कोड 1889 मध्ये तयार करण्यात आला. मुंबई सामान्य विभागाचा आदेश क्रमांक क्र.2323 दिनांक 20/06/1916 रोजी. सन 1916 मध्ये भिंगार नगरपालिका सरकारच्या छावणी हद्दीत समाविष्ट करण्यात आली आणि तेव्हापासून भिंगार छावणी मंडळ हे अस्तित्वात आले.

भिंगार छावणी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर चटई क्षेत्राचा जो प्रश्न होता तो आजपर्यंत सुटलेला नाही त्यामुळे भिंगार मध्ये घरे बांधण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याचप्रमाणे इतर काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाबाबत सुद्धा छावणी मंडळाला मर्यादा असल्याने ते प्रश्न सुटू शकले नाहीत त्यामुळे छावणी मंडळातून सुटका व्हावी अशी मागणी भिंगार मधील नागरिकांची आहे.
भिंगार छावणी मंडळात सात सदस्य नागरिकांमधून निवडून जातात मात्र त्यांना हवे तेवढे अधिकार नसल्यामुळे त्यांच्या कामकाजावर मर्यादा येत असल्याने भिंगार छावणी मंडळाचे सदस्य हे नामधारी सदस्य असल्यासारखेच असतात सर्व अधिकार अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड स्टेशन कमांडर यांच्या कडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच असतात.
त्याचप्रमाणे अहमदनगर महानगरपालिकेची स्थापना 2003 साली करण्यात आली महानगरपालिकेची स्थापना करण्यासाठी अहमदनगर शहरात शेजारी बुरुडगाव, बोल्हेगाव,केडगाव ही ग्रामपंचायतची गावे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती कालांतराने बुरुडगाव पुन्हा वगळण्यात आले होते कारण बुरूडगाव मधील ग्रामस्थांनी महापालिका हद्दीत येण्यास विरोध दर्शवला होता.

अहमदनगर महानगरपालिका 2003 साली स्थापन होऊनही वीस वर्ष झाले तरी विकास अद्याप झालेला नाही. तर महानगरपालिकेत हद्दवाढी मध्ये समाविष्ट झालेल्या केडगाव आणि बोल्हेगाव मधील काही भागात अद्यापही परिस्थिती अत्यंत खराब आहे. वीस वर्षांपासून नागरिक अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. रोड, पाणी, वीज, आणि आरोग्य या सर्वच बाबतीत अद्यापही या भागात प्रतीक्षा करावी लागत आह. तर शहराच्या आसपास नव्याने होणाऱ्या उपनगरातही हीच परिस्थिती आहे. महानगरपालिका हद्द वाढ झाली मात्र हद्दवाढी मध्ये आलेल्या गावांमध्ये विकास करण्यासाठी शासनाकडून कोणताच निधी आलेला नाही तसेच अपुरे कर्मचारी आणि नगर मधील राजकारण यामुळे महानगरपालिका होऊन 20 वर्ष झाले तरी विकास नावालाच आहे.

त्यामुळे आता भिंगार शहर जरी अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत घेण्याचा विचार होत असला तरी भिंगार मधील अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी पुरेसा निधी महपालिकेत मनुष्यबळ असेल तरच महानगरपालिकेच्या हद्दीत येऊन भिंगारकरांना उपयोग होणार आहे. महापालिका हद्दीत येऊन भिंगारकरांचा चटई क्षेत्र प्रश्न सुटू शकतो मात्र विकास बाबत कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. अन्यथा भिंगारकरांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी होऊ शकते.

वीस वर्षांपासून नगरकर विकासासाठी लढत आहेत त्यामुळे ही परिस्थिती पाहता भिंगारकरांनी महापालिका हद्दीत न येता स्वतंत्र नगरपालिकेची मागणी केली तर सोयीचे होईल. कारण नगर शहर आणि भिंगार मधील अंतर दोन्ही शहराच्या मध्ये असलेली लष्कराची जागा यामुळे अनेक गोष्टींचे बंधने पुन्हा येऊ शकतात त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या भिंगार शहर महानगरपालिकेत आले तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे राजकीय दृष्ट्या घोषणा करणे फार सोपे असते मात्र कालांतराने पुढे त्या गोष्टी निभावणे फार कठीण जाते. त्यामुळे राजकीय फायदा पहाण्यापेक्षा नागरिकांचा फायदा पाहणे गरजेचे असल्यामुळे भिंगारकरांनी पुन्हा एकदा विचार करून महापालिका हद्दीत यावे की नगरपालिकेची मागणी करावी यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. कारण महापालिका हद्दीत आल्यानंतर त्यांना पुन्हा दुसरीकडे जाण्याचा मार्ग राहणार नाही त्यामुळे हा शेवटचा मार्ग असल्याने भिंगारकरांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version