Homeक्राईमतोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा राडा.. खून प्रकरणातील आरोपी फरार मात्र पोलिसांना...

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा राडा.. खून प्रकरणातील आरोपी फरार मात्र पोलिसांना आरोपी सापडेना तर हल्लेखोरांना मात्र ठावठिकाणा कळतो हे विशेष… सहा महिन्यात दोन खून, एक हाफ मर्डर हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होऊनही गुटखा विक्रीच्या टपऱ्यां खुलेआम सुरूच .. अजून एखादा खून होण्याची पोलिसांना प्रतीक्षा आहे का?

advertisement

अहमदनगर दि.२ डिसेंबर
बालिकाश्रम रस्त्यावर झालेल्या ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर शनिवारी सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला.

बबलू सरोदे याला सावेडी नाका येथून उचलून
जबर मारहाण करत शिवम थिएटर जवळील फुलसौंदर चौकात आणून टाकले होते. ही घटना कालचा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व शहरातील इतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी धावून आले होते.
बबलू सरोदे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्याकरता दाखल करण्यात आले होते बबलू सरोदे याच्या पायाला फॅक्चर झाले असल्याचं समजले आहे.
ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा २० जूनला पहाटे
वाजण्याच्या सुमारास तलवारीने वार करत खून करण्यात आला होता या खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे, नंदू बोराटे याच्यास संदिप गुडा, रवी अप्पासाहेब नामदे, वैभव बबन हुच्चे,, अनिकेत सोळंके हे आरोपी सध्या सब जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत तर यातील बबलू सरोदे हा खून झालेल्या घटनेपासून फरार होता.

बबलू सुरवसे नगरमध्ये येणार असल्याची माहिती हल्लेखोरांना आधीच समजली होती कारण जेव्हा बबलू सरोदे हा सावेडी नाका येथे बसमधून उतरल्यावर लगेच हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली होती. गामा उर्फ ओंकार भागानगरे याच्या खून प्रकरणातील मुख्य
आरोपी असलेल्या गणेश हच्चे याच्या माळीवाडा परिसरातील फुलसौंदर चौकात असलेल्या हॉटेलसमोर बबलू सरोदे याला आणून टाकले होते.
या घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलिस
निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माळीवाडा येथे दाखल झाले होते.

बबलू सरोदे हा तीन महिन्यापासून फरार होता मात्र पोलिसांना याचा तपास लागू शकला नाही परंतु बबलू सरोदे याला मारहाण करणाऱ्या तरुणांना त्याचा तपास लागला हे मोठे विशेष आहे मग तो काना पोलीस आणि तपासे अधिकारी नेम करत काय होते. गामा उर्फ ओंकार भागानगरे खून प्रकरण राजकीय दृष्ट्या चांगले तापले होते मात्र तरीही यामधील आरोपी तीन महिन्यापेक्षा जास्त काळ फरार राहतो मात्र तोफखाना पोलिसांना याचा तपास लागत नाही हे विशेष आहे . तोफखाना पोलीस नेमकं करतात काय असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. गेल्या सहा महिन्यात दोन खून एक जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर घटना होऊनही तोफखाना पोलीस वरिष्ठ अधिकारी अजूनही शांतच आहेत. गुन्हेगारांवरील धाकच कमी झाला असल्याचा प्रत्येय तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतोय.

तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक अवैद्य धंदे सध्या जोमात सुरू असून याकडे लक्ष देण्यात वेळ जात असल्यामुळे खुनासारख्या गंभीर घटनांकडे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना वेळ मिळत नाही का? असा उपरोधिक प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular