अहमदनगर दिनांक 23 नोव्हेंबर
एम एस ई बी सी वरीष्ठ तंत्रज्ञ सुखदेव अश्रुबा नागरगोजे यांना मानाहन करून जखमी केल्याप्रकरणी प्रितम मारुती धाडगे (रा नागरदेवळे फाटा नागरदेवळे ता जि अहमदनगर) याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भ द वि 353.186.323.504.506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम एस ई बी सी वरीष्ठ तंत्रज्ञ सुखदेव अश्रुबा नागरगोजे हे भिंगार येथील नगर पाथर्डी रोडवरील सोपान वडेवाला समोर भिंगार शासकीय काम करत असतांना प्रितम मारुती धाडगे याने शासकीय काम करुन नये म्हणून नागरगोजे यांना अटकाव करुन अडथळा केला तसेच शिवीगाळ दमदाटी करुन नागरगोजे यांच्या तोडांत चापट मारुन दुखापत केली अशा अशा विरोधी वरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ व्ही आर गारुडकर करत आहेत.