अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील नगर पुणे रोडवर भरदिवसा दुपारी दोनच्या सुमारास एका महिला दुचाकी स्वराच्या गळ्यातील चैन ओढून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकाणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पलक विक्रम चुग या नगर-पुणे रोडवरील मिलीटरी गुरूदवारासमोरुन त्यांच्या मोपेड वरुन त्यांच्या मुलाला शाळेतुन आणण्यासाठी जात असतांना मागून आलेल्या मोटरसायकलस्वराने त्यांच्या गळ्यातील 15000/- रू किमतीची सोन्याची एक तोळा वजनाची चैन हिसकावून पळवून नेली आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चुग यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्भ भा द वि क 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पो स ई के.आर साळुंके करत आहेत