अहमदनगर दि.२८ जुलै
सालाबाद प्रमाणे अहमदनगर उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व भूमी अभिलेख कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्याकडून जिल्हा अध्यक्ष अरिफ शेख यांच्या हस्ते दोन्ही सवाऱ्यांवर फुलाची चादर अर्पण करण्यात आली यावेळी जेष्ठ कामगार नेते आणि केंद्रीय अध्यक्ष एन .एम. पवळे तसेच कास्ट्राइब महासंघ जिल्हा अध्यक्ष के.के. जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर शहरातील मोहरम उत्सव हा ऐतिहासिक असून त्याला पाचशे वर्षाची अखंड परंपरा आहे. या पाचशे वर्षाच्या मोहरम उत्सवाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर, भारतातील सर्व समाज बांधव उत्साहाने सामील होतात आणि या सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन बंधू भावाने हा उत्सव साजरा करतात त्यामुळे ह्या सणाला जातीय सलोखा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो.असे प्रतिपादन आरिफ शेख यांनी केले आहे.