Homeराज्यअहमदनगरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास जाणार या मार्गावर लवकरच सुरू...

अहमदनगरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास जाणार या मार्गावर लवकरच सुरू होणार इंटरसिटी रेल्वे सेवा…

advertisement

अहमदनगर दि.२९ जुलै
अहमदनगर जिल्हावासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न आणि मागणी आता पूर्णत्वाच्या मार्गावर जात असून लवकरच नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.सुथो याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच या मार्गावरील रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल असेही खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.

मात्र ही रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर ती सेवा सुरू राहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. नगर मार्गे पुण्यापर्यंत ही इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू होणार असून अडीच ते तीन तासाचा वेळ या मार्गाने पुण्यासाठी लागणार आहे. मात्र थेट पुणे स्टेशन पर्यंत ही रेल्वे धावणार असल्यामुळे नगरचा माणूस पुणे शहराच्या मध्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. सुथो अहमदनगर पुणे महामार्गावर सध्या वाघोली पासून अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो त्यामुळे पुण्यामध्ये जायला अनेक तास लागतात नगर ते पुणे अंतर हे रस्त्याने दोन तासाचे आहे मात्र पुण्याच्या मध्यभागापर्यंत जाण्यासाठी जवळपास चार ते साडेचार तास जात असल्यामुळे अनेक वेळा नागरिक कंटाळून जातात त्यामुळे नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे मार्ग हा रोजच्या प्रवाशांना सोयीचा ठरणार आहे त्याचप्रमाणे अहमदनगर शहरासह बीड जिल्ह्यातील नागरिकांनाही या रेल्वे मार्गाचा भविष्यात फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता अहमदनगरकरांचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular