अहमदनगर दि. ८ ऑगस्ट
सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे हे आज-काल फॅशन बनली आहे. रस्ता म्हणजे आपल्या मालकीचा आहे अशा थाटात अनेक तरुण आजकाल रस्त्यावरच वाढदिवस साजरा करताना दिसतात यामुळे जाणाऱ्या नागरिकांना काही अडथळा होईल याची तमा न बाळगता रस्ता अडून वाढदिवस साजरा करणे म्हणजे मर्द पणाचे काम करण्याचा आविष्कार आजकालच्या तरुण पोरांमध्ये आहे.
असाच काहीसा प्रकार सावेडी उपनगर मधील गंगा उद्यान जवळ घडला असून काही तरुण मुलं रस्ता अडवून वाढदिवस साजरा करत होते. रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन आरडा ओरडा करत असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असताना काही मुले रोडवर वाहने आडवी लावुन, आरडा ओरडा करत वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसुन आले. पोलिसांची गाडी आल्याचे पाहताच काही मुलांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र बड्डे बॉय यश योगेश नरसिंगपुरकर, आकर्ष गणेश दहिडे,तेजस नंदकिशोर चव्हाण, अविष्कार अशोक कुलकर्णी, रोहन प्रकाश वडवणीकर,अमित गणेश भिंगारे, विशाल संजय आंबिलढगे,यांना ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आणले व त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा विचार करुन त्यांच्यावर कठोर कारवाई न करता त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर वरील मुलांच्या पालकांना समक्ष पोलीस स्टेशनला बोलावुन घेवुन यापुढे असे टवाळखोर कृत्य करणार नाही या आश्वसासनावर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मधुकर साळवे, पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर यांच्याकडुन नागरीकांना नम्र आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कॉलेज, क्लासेसला जाणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत, ते बाहेर काही टवाखोरी करतात काय ? या बाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनुक करणारी इसमे अढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी.