Homeराजकारणभारतीय जनता पक्षाचे १००० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट्य सर्वप्रथम अहिल्यानगर शहर भाजपचे उपाध्यक्ष...

भारतीय जनता पक्षाचे १००० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट्य सर्वप्रथम अहिल्यानगर शहर भाजपचे उपाध्यक्ष ॲड.धनंजय जाधव यांच्याकडून पुर्ण

advertisement

नगर दिनांक 30 जानेवारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन ही पर्व या अभियानांतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे त्यात अहील्यानगर शहर भाजपा चे उपाध्यक्ष अॅड. धनंजय जाधव यांनी अहिल्यानगर विधानसभा क्षेत्रातुन सर्वप्रथम १००० सदस्यांचे उद्दिष्ट्य पुर्ण केल्याबद्दल मा.खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार त्यांचा करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाने ठरवून दिल्याप्रमाणे १००० प्राथमिक सदस्यांचे उद्दिष्ट्य पुर्ण केले त्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री, तथा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ॲड.धनंजय जाधव यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले.तसेच जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मा.रविजी अनासपुरे,संघटन मंत्री विजयजी चौधरी,शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर ,सरचिटणीस सचिन पारखी ,नोंदणी प्रमुख प्रशांत मुथा तसेच पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना डॉ .सुजय विखे पाटील म्हणाले की, ॲड.धनंजय जाधव हे हरहुन्नरी कार्यकर्ते असून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक अभियानात हिरीरीने सहभागी होतात. तसेच ते शासनाच्या विविध योजनंद्वारे नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात . त्यांच्या सारखा कार्यकर्त्यांस काम करण्यास मिळाल्यास तो त्याच्या संघटन कोशल्याचा नक्कीच पक्षवाढीसाठी उपयोग करील असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

याप्रसंगी सत्करास उत्तर देताना ॲड.धनंजय जाधव म्हणाले की, माझ्यावर पक्षानी जी जबाबदारी दिली ती नेहमीच योग्यरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न मी करत आलो आहे. लोकसभा निवडणुकीत देखील सुजयदादा विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य माझ्या प्रभागातून दिले तसेच महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनादेखील त्याचप्रमाणे मताधिक्य मिळवुन दिले. तसेच अजुन अधिक लोकांना मार्गदर्शन करुन भारतीय जनता पक्षात सामील करुन घेण्याचे कार्य सातत्याने करत राहीन असे प्रतिपादन ॲड. धनंजय जाधव यांनी दिले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular