Home राजकारण महापालिकेचे आरक्षण जाहीर झाले आणि पक्ष प्रवेश लांबले… आरक्षणाने कहीं खुशी कही...

महापालिकेचे आरक्षण जाहीर झाले आणि पक्ष प्रवेश लांबले… आरक्षणाने कहीं खुशी कही गम…

अहिल्यानगर दिनांक 12 नोव्हेंबर

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता जवळ आली असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेऊन निवडणुकीच्या तयारीत बाजी मारली आहे. तर आता टप्प्याटप्प्याने इतर राजकीय पक्ष ही आपल्या पक्षाकडून लढणारे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहेत.

Oplus_131072

ही निवडणूक भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मनसे आशा महाविकास आघाडी बरोबर होणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार हे येणारा काळच सांगेल.

मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांतरे पाहायला मिळणार आहेत. भारतीय जनता पार्टी मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात इन्कमिंग सुरू आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिग्गज नगरसेवक, पदाधिकारी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. त्या बाबत जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र हा प्रवेश थांबवला गेला महानगरपालिकेचे पडलेले आरक्षण त्याची गणिते पाहून हे प्रवेश काही दिवस थांबवले असले तरी आता पुढील आठवड्यात थांबलेले प्रवेश होऊ शकतात अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version