दिल्ली दि.१० जून
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ हिंदू सेना शनिवारी दिल्लीत मोर्चा काढणार आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शुक्रवारी देशातील अनेक भागात निदर्शने करण्यात आली. जुमच्या नमाजनंतर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने झाली. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना उघडकीस आल्या.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या निपुर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान, हैदराबाद ,महाराष्ट्र या राज्यांमध्ये निषेध मोर्चे आणि बंदचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ आता हिंदू सेना मैदानात उतरली असून हिंदू सेना शनिवारी दिल्लीत मोर्चा काढणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.