Homeक्राईमचित्रपटाला शोभेल अस रक्तचंदनाचा साठा लपावणाऱ्या "झावरेला" एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या छापा...

चित्रपटाला शोभेल अस रक्तचंदनाचा साठा लपावणाऱ्या “झावरेला” एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या छापा टाकायला गेलेले पोलीस निघाले होते रिकाम्या हाती मात्र ती गोणी हटवली आणि मिळाले घबाड

advertisement

अहमदनगर – दि.४ जून

नगर शहरातील एमआयडीसी परिसरातून सुमारे साडेसात टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे सव्वातीन कोटी रुपये किमतीचा हा माल असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितलं की, एमआयडीसी परिसरातील सदाशिव झावरे यांच्या मालकीच्या गोदामात बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवलं असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार तेथे पोलिसांनी छापा घातला. मात्र गोदामा शेजारी ओढा असल्याने त्याची दुर्गंधी आणि रक्तचंदनच्या वर बटाट्याच्या गोण्या ठेवण्यात आल्याने पोलीस पथकही आधी चक्रावून गेले होते मात्र जेव्हा बटाट्याच्या गोण्या काढण्यात आल्या तेव्हा रक्तचंदन आढळून आले. हे रक्तचंदन कर्नाटक राज्यात जास्त करून भेटत असल्याने या बाबत पोलीस तपास करणार असून कॉस्मोटिक उत्पादनासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो त्यामुळे हे रक्तचंदन कुठून आले व कुठे जाणार होते या बाबत पोलीस तपासात माहिती समोर येईल. पहा व्हिडिओ

 

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदाशिव सिताराम झावरे (वय ४५ वर्ष रा. दुध डेअरी चौक एमआयडीसी अहमदनगर) व त्याच्या तीन साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,प्रभारी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अजित पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि/युवराज आठरे, पोसई/दिपक पाठक,पोसई/चांगदेव हंडाळ,सफौ/लोखंडे, सफौ/राजेंद्र गायकवाड,पोहेकॉ/नंदकिशोर सांगळे,पोना मच्छिंद्र पांढरकर,पोना/भास्कर मिसाळ,पोना/महेश दाताळ,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/सचिन हरदास,पोकाॅ भगवान वंजारी,पोकाॅ/प्रशांत धुमाळ,चालक/पोहेकॉ गिरवले आदिंच्या पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular