Home शहर पालिकेत अधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक न राहिल्यानेच अनागोंदी 32 कोटींची दफनभूमी खरेदी...

पालिकेत अधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक न राहिल्यानेच अनागोंदी 32 कोटींची दफनभूमी खरेदी व्यवहार झाल्यास पालिकेचे कामकाज चालू देणार नाही : विक्रम राठोड

अहमदनगर दि.३० नोव्हेंबर

महानगर पालिकेच्या तिजोरीत खंडखडात असताना कवडीमोल भावाची जमीन अव्वाच्या सव्वा किमत दाखवून 32 कोटी रुपयांची दफन भूमी खरेदी करण्याचा व्यवहार झाल्यास आम्ही पालिकेचे कामकाज बंद पाडू आणि पालिका बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्याची विनंती सरकारला करू कोणत्याही परिस्थितीत आम्ही पालिकेचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी दिला आहे.

याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
अहमदनगर महानगर पालिकेत अनागोंदी सुरू आहे. विकास कामासाठी पालिकेकडे पैसा नाही . राज्य सरकारने दिलेल्या अनुदानावर पालिकेचा कारभार रडत खंडत सुरू आहे. अशा परिस्थितित पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करून पालिका पदाधिकारी प्रशासनाला वेठीस धरून मन मानी ठराव समंत करून घेत आहेत. पालिकेत आमची सत्ता असताना आमच्या डोळ्यादेखत बेकीयदेशीर ठराव करून मोठा आर्थिक लाभ होण्यासाठी भूखंडांचे श्रीखंड करून खाण्याचा डाव भाजपा आणि राष्ट्रवादीने अधिकाऱ्यांशी संगनमत करून मांडला आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही . पालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार आहेत.

एक प्रकारे रीतसर स्क्रिप्ट लिहून विकास कामांच्या नावाखाली मोठा पैसा उकळण्याचा करेक्ट कार्यक्रम भाजपा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस ने चालवला आहे. अवघ्या 8 कोटी रुपयांची जमीन 32 कोटी रुपये किमतीला खरेदी करून भाजपच्याच नगरसेविकेचा फायदा करून घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा प्रकार पालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याशिवाय घडू शकत नाही. आमचा या विषयाला विरोध असून तर आता स्व आमदार अनिल भैय्या राठोड असते तर हे घडुच दिले नसते. अशावेळी भ्रष्ट सत्तेचा त्याग त्यांनी केला असता.

निधी नसल्याचे कारण दाखवीत एकीकडे सावेडी नाट्य संकुलाचे काम बंद पाडण्यात आले आहे. मनपा कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगाचा फरक देण्यात आलेला नाही अनेक कामे बंद आहेत. शहरतील एकही रस्ता धड नाही. असे असताना जर कवडीमोल किमतीची जमीन दस पट चढया भावाने विकत घेण्याचा घाट जर पालिकेने घातला तर या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू आणि पालिकेचे कामकाज बंद पाडू असे विक्रम राठोड यांनी पत्रकात म्हंटले आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version