HomeUncategorizedखाकी कपडे घालून लुटीचा धंदा...बायपास रोड वर वाहतूक नियमन करण्याच्या नावाखाली खुलेआम...

खाकी कपडे घालून लुटीचा धंदा…बायपास रोड वर वाहतूक नियमन करण्याच्या नावाखाली खुलेआम सुरू आहे खंडणी वसुली…

advertisement

अहमदनगर दि.२८ फेब्रुवारी
खाकी कपडे घालून वाहन लुटण्याचा धंदा सध्या जोरात सुरू असून या लुटण्याला सर्वसामान्य शेतकरी बळी जातोय मात्र या लुटण्यामागे कोणाचा हात आहे या बाबत अद्याप काही माहिती हाती आली नसली तरी दोन दिवसांपूर्वी अशा लुटणाऱ्या तरुणाला काही जणांनी चांगला चोप दिल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.


अहमदनगर शहराच्या चारही बाजूंनी सध्या बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.बऱ्यापैकी काम पूर्णत्वास आले असून नगर सोलापूर रोडवर असलेल्या वाळुंज येथील बायपास चौकात काही तरुण खाकी कपडे घालून उभे राहतात आणि ज्या मालवाहू मोठ्या ट्रक अशी वाहने शहरातून जाणार आहेत त्यांना शहरात जाऊ न देता बायपास रोड वरून वाहतूक वाळवण्यासाठी हे तरुण उभे असल्याची माहिती हाती आली आहे. बायपास रस्ते बनवणाऱ्या एका कंपनीने नेमलेल्या एका एजन्सीद्वारे ही तरुण मुले या ठिकाणी वाहनांचे नियमन करण्यासाठी उभे असल्याची माहिती मिळाली मात्र वाहनांचे नियमन सोडून इतर धंदेच या ठिकाणी सुरू आहेत. वाहनधारकांना अरेरावी तसेच वाहनदारांकडून पैसे वसूल करण्याचा धंदा सध्या या खाकी कपडे घातलेल्या तरुणांकडून होत आहे.या रोड वरून जे शेतकरी आपला माल घेऊन नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात जात असतात त्या शेतकऱ्यांवर दादागिरी करून गाडी अडवली जाते पैसे दिले तर गाडी आत सोडली जाते अन्यथा गाडी बायपासने जाऊन द्या असे फर्मान या तरुणांकडून काढले जाते एखादी गाडी पुढे गेलीच तर तिचा पाठलाग करून गाडी थांबवून वाहन चाकण चालकाला शिवीगाळ केली जाते असे प्रकार साध्य सुरू आहेत. सोलापूर रोड वरून मार्केट यार्ड मध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याला जवळपास 30 ते 40 किलोमीटर फिरून शहरात यावे लागते या नाहक खर्चाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उभा राहतोय.

विशेष म्हणजे ज्या एजन्सीच्या वतीने या तरुणांना खाकी कपडे घालून या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी उभे केले गेले आहे त्यांच्याजवळ कोणतेही ओळखपत्र आढळून येत नाही तसेच या कंपनीकडे वाहतूक नियमन करण्यासाठी रस्ते बांधणी कंपनीने कोणतेही लेखी पत्र दिले नाही अशी माहिती समोर आली आहे. मग ही अवैद्य वाहतूक नियमन आणि अवैद्य पैसे वसुली म्हणजे खंडणीचाच प्रकार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खंडणीखोर तरुणांवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा हा धंदा राजरोसपणे सध्या वाहतूक नियमानाच्या नावाखाली खाकी कपडे घालून सुरू आहे. मात्र यामुळे नाहक पोलीस प्रशासनाची बदनामी होत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करावी अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे.

त्याच प्रमाणे नगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर शेंडी येथील बायपास चौफुली चौकात रात्रीच्या वेळेस ट्राफिक पोलीस बाजूला उभे असताना एक तरुण शहरात जाणाऱ्या ट्रक सारख्या वाहनांकडून पैसे वसूल करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मग शेजारीच उभे असलेले ट्राफिक पोलीस या तरुणाला काही बोलत का नाहीत अथवा पैसे वसूल करण्यापासून रोखत का नाहीत त्यामुळे ट्राफिक पोलिसांचाही यामध्ये काही सहभाग आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहतोय मात्र अशा या गोष्टींमुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब होत आहे.

त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दाखल घेऊन खाकी कपड्यांमध्ये जे लोक ट्रक चालकांकडून पैसे वसूल करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची गरज आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular