Homeशहरअहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च चा 19 वा वर्धापन दिन...

अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च चा 19 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. मंदिरांच्या माध्यमातून धार्मिक व सुसंस्कृत पिढी निर्माण होते – देवदान कळकुंबे

advertisement

अहमदनगर दि.२५ डिसेंबर – मंदिरांच्या माध्यमातून  देवाची प्रेरणा मिळते या यातून धार्मिक व सुसंस्कृत पीडी निर्माण होण्यासाठी मदत होते प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांसाठी काम करण्याचा उपदेश दिलेला आहे तो प्रत्येकाने आत्मसात करून गरजूंना मदत करावी सर्वांच्या आशीर्वादानेच बूथ हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोणा काळात चांगले काम करू शकलो आहे.अहमदनगर पहिली मंडळी चर्च चे धार्मिक व सामाजिक काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन देवदान कळकुंबे यांनी केले.
अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च चा 19 वा वर्धापन दिन हवेत फुगे सोडून उत्साहात साजरा करण्यात आला   यावेळी मंडळीचे आचार्य रेव्ह.जे. आर.वाघमारे, बूथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे,पत्रकार सुधीर लंके, खजिनदार सॅम्युएल खरात, सेक्रेटरी अमोल लोंढे, कार्यक्रम समिती अध्यक्ष राहुल थोरात, प्रसन्न शिंदे, श्रीकांत गायकवाड, गिरीश शिरसाठ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार सुधीर लंके म्हणाले की, नगर जिल्ह्याच्या योगदानामध्ये ख्रिस्ती समाजाचा मोठा वाटा आहे. क्लेरा ब्रूस मैदान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सुरुवात केली या जागेला मोठा इतिहास लाभलेला आहे. याचे जतन करने हे प्रत्येकाचे काम आहे सध्या जाती धर्म मध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू आहे मात्र सर्व धर्माची शिकवण एकच आहे नाताळ साजरा करणे म्हणजे दुःखितांचे दुःख दूर करणे होय.प्रत्येक धर्मामध्ये सांगितले आहे की एकमेकावर प्रेम करणे, आदर करणे, नम्रपणे वागणे याचे सर्वांनी पालन करावे प्रभू येशु ख्रिस्तांची शिकवण समाजाला नेहमीच प्रेरणा देणारी आहे असे ते म्हणाले.
आचार्य रेव्ह.जे. आर.वाघमारे म्हणले की अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च ची स्थापना १८३३ आली झाली आहे मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या चर्च ला १९ वर्ष पूर्ण होत आहे या मंदिरातून उपासनेच्या माध्यमातून धार्मिकता वाढीसाठी मदत होत आहे. युवा वर्ग एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात वर्धापन दिन व नाताळ सण साजरा करत आहे असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular