अहमदनगर दि.२४ डिसेंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील पालकांना एक आवाहन करण्यात आले असून हे आवाहन आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कारण नातळाच्या पार्श्वभूमीवर जर कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना जबरदस्तीने सांताक्लॉज बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या नाताळाची धूम धाम सुरू असून अनेक इंग्रजी शाळांमध्ये नाताळाच्या पार्श्वभूमीवर संस्कृतीक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवले जाते. मात्र नगर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत संताक्लॉज बनण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्तीचे केले तर कोणत्याही सक्ती ला भिक घालू नका असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले आहे.
पहा व्हिडीओ