HomeUncategorizedसंडे स्पेशल- तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा गुटखा मावा हद्दपार करूयात

संडे स्पेशल- तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा गुटखा मावा हद्दपार करूयात

advertisement

अहमदनगर दि.२४ डिसेंबर

सोळावं वरीस धोक्याचं असं नेहमीच बोललं जातं मात्र हे वय असं असतं की त्या पौगंड अवस्थेत आपण काय करतोय हे त्या अवस्थेतील मुलांना कळतच नाही तेव्हाचं मन हे चंचल असतं समोरचा काय कृती करतोय ही कृती आपणही करावी असं नेहमीच या वयात असलेल्या मुलांना वाटत असतं आणि यामुळेच अनेक पौगंड अवस्थेतील मुलं व्यसनाच्या आहारी जातात आणि पुढे संपूर्ण आयुष्य बरबाद करून ठेवतात.

अहमदनगर शहराचा विचार केला तर अनेक तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आजही नगर शहरात खुले आम केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आणली असली तरी आजही शहरात लाखो करोडो रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाने बनवलेला मावा विकला जातोय. पोलीस असतील अथवा अन्न औषध प्रशासन असेल यांच्या कारवाया होतात मात्र ही विक्री बंद होत नाही. कारण या विक्रीची चैन फार मोठी असून या चैनीमध्ये अनेक मातब्बर लोक असल्यामुळे ही चैन विस्कळीत करणे अशक्य आहे हे तेवढेच सत्य आहे.

जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील एकूण 130 कोटी लोकसंख्येपैकी 28.6 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. सुमारे १८.४ टक्के तरुण केवळ तंबाखूचेच नव्हे तर सिगारेट, बिडी, खैनी, बीटल, अफू, गांजा यासारख्या घातक मादक पदार्थांचे सेवन करतात, अशी धक्कादायक बाब या अहवालात समोर आली आहे.

पहा गुटखा कसा बनतो आणि कसा विकला जातो

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular