HomeUncategorizedदिवाळीचे राजकीय फटाके फुटणे सुरूच खा. विखे आमदार राम शिंदे यांचे वाक्य...

दिवाळीचे राजकीय फटाके फुटणे सुरूच खा. विखे आमदार राम शिंदे यांचे वाक्य युद्ध थांबता थांबेना.. खासदार सुजय विखे यांनी आमदार राम शिंदे यांना मिठाई भरवली मात्र आमदार राम शिंदेंनी आमदार लंकेंना मिठाई भरवली

advertisement

अहमदनगर दि.१७ नोव्हेंबर

नगर दक्षिण जिल्ह्यात दिवाळीच्या फराळावरून चांगलेच राजकीय फटाके फुटत असून शुक्रवारी चौंडी येथे भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रम ठेवण्यात आला होता या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप करणारे दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील आणि राम शिंदे हे एकत्रितपणे दिसले खासदारकीची निवडणूक लढवण्यापासून ते उत्तरेकडे सर्व प्रमुख कार्यक्रम घेण्यावरून आमदार राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलेच सुनावले होते.

तर ही कटूता कमी करण्यासाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या सांगण्यावरून खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार राम शिंदे यांना मिठाई भरवली खरी मात्र आमदार राम शिंदेंनी सुजय विखे यांना मिठाई भरवली नाही. मात्र काही तासानंतर शुक्रवारी रात्री पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या दिवाळीच्या फराळ कार्यक्रमाला आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांनी एकमेकांना मिठाई भरवली.

यावेळी बोलताना आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे यांच्यावर पुन्हा नाव न घेता टीका केली आमच्या दोघांकडेही साखर कारखाने नाहीत त्यामुळे आम्ही विकतची साखर घेऊन फराळ बनवले असून हे फराळ नक्कीच गोड असणार आहे आम्ही दोघे एकत्र आलो तर चर्चा होतात असा मिश्किल टोला त्यांनी यावेळी लगावला तर भाजप नेते विवेक कोल्हे यांनीही आमदार निलेश लंके यांच्या अंगावर 2024 मध्ये गुलाल पडावा मग तो कोणत्याही निवडणुकीचा असो असे म्हणत पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना डीवचले आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद हा थांबता थांबत नसून येणाऱ्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत बंडाळी रोखण्याचा मोठे आव्हान पक्ष श्रेष्ठीं समोर असणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular