Homeशहरअहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडळकर यांची निवड

अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडळकर यांची निवड

advertisement

अहमदनगर दि.१५ डिसेंबर –
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशनच्या नूतन कार्यकारणी सदस्यांच्या सभेमध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधी करता जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडळकर यांची निवड करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  तसेच  राज्य केमिस्ट असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी अजित पारख व  व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जवाहरलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अहमदनगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोशियनच्या नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड करन्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडळकर, उपाध्यक्षपदी सूर्यकांत भुजाडी, गणेश वाणी,  अतुल चांगले, सचिव आबासाहेब बेद्रे, सहसचिव सचिन शिंदे, खजिनदार प्रशांत उबाळे याचबरोबर सदस्य पदी विभागीय सचिव शशांक रासकर  चेतनकुमार कर्डिले, संदेश जाजू, ज्ञानेश्वर दरंदले, बाळासाहेब ढेरंगे, साहेबराव आहेर, शैलेंद्र औटी, सुरज लांडे, आशुतोष कुकडे, अमित धाडगे, अवधूत बोरुडे, विजय जगताप, सुहास जरांगे, रवींद्र गुलाटी, रुपेश भंडारी, युवराज खेडकर,सचिन अमृतकर, तात्याराम बांदल आदींची निवड करण्यात आली आहे. सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
           यावेळी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर म्हणाले की, अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची निवडणूक मुंबई येथे नुकतीच पार पडली आहे. सर्व सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी दिली आहे त्या संधीचे कामाच्या माध्यमातून सभासदांचे प्रश्न सोडू महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम उभे करू असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular