अहमदनगर दि.१५ डिसेंबर
अहमदनगर शहरातील भिंगार परिसरामधील भिंगार हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 17 वर्षीय तरुणाला दहा ते पंधरा तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे महाराज झालेला 17 वर्षे तरुण हा भिंगार हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असून गुरुवारी सकाळी भिंगार हायस्कुल येथे गॅदरिंगचा बक्षीस समारंभ असल्याने गेला होता. हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना मागील काही विद्यार्थ्यांनी त्याला खडे मारले याबाबत मागील मुलांना जाब विचारला असता त्यांनी त्या तरुणास तू बाहेर दाखवतो असे सांगून तो तरुण शाळेच्या बाहेर आल्यानंतर त्याला तुझ्या मित्राने बुधवारी झालेल्या मोर्चातील लवजिहादचा फोटो स्टेटसला का ठेवला म्हणून दहा ते पंधरा जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच परत जर आमचे समजाचे विरोधात मोबाईलवर काही फोटो अगर स्टेटस ठेवले तर तुम्हा एका एकाला जीवे मारुन टाकु अशी धमकी दिली.
याप्रकरणी भिंगार कॅम्प ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध भदवी कलम 323,504,506,14,3,147,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनेक तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.