Homeराज्यवाचाळवीरांच्या पंक्तीत आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा...

वाचाळवीरांच्या पंक्तीत आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख

advertisement

जालना दि.५ डिसेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोशियारी, भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी भाजपचे आमदार प्रसाद लाड सध्या चांगलेच चर्चेत आहेत आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी मध्ये या सर्वांबद्दल संतापाची लाट पसरली आहे. आता याच पंगती मध्ये पुन्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नंबर लागला आहे. त्यांनी या सर्वांच्या बाबात खुलासा करताना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे रावसाहेब दानवे पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल ज्या लोकांनी चुकीचे वक्तव्य केले आहे त्यांची सारवा सराव करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियारी यांना हटवण्यासाठी सध्या मोठी मोहीम उघडली असून खासदार उदयनराजे भोसले यांनीही थेट पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी नव्हे तर कोकणात झाल्याचा उल्लेख केला होता मात्र त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करून वक्तव्य मागे घेतले घेतले आहे. मात्र भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी आणि राज्यपाल यांनी अद्यापही कोणताही खुलासर्व न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आणि आता पुन्हा या पंक्तीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भर पडली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular