अहमदनगर दि.१ मे
अहमदनगर शहरातील सावेडी वीज वितरण कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून आता एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का ? असा सवाल कर्मचारी करू लागले आहेत.सावेडी वीज वितरण कार्यालय हे प्रोफेसर कॉलनी चौकातील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील मागच्या बाजूस आहे. या व्यापारी संकुलाची अवस्था अत्यंत दयानिय झाली असून ज्या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे त्या ठिकाणच्या स्लॅब अक्षरशः कधीही पडू शकतो तसेच भिंती सारकल्या असून जमीन भुसभुशीत झाल्यामुळे या ठिकाणी उंदीर,साप, विंचू यांचे साम्राज्य सर्रास असते. या सर्व अडचणींवर मात करत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अडचण कधी लक्षात येणार! जर एखाद्याचा जीव गेल्यानंतर कंपनी जागी होईल का ? असा प्रश्न समोर येतोय.
तसेच वीज वितरण कार्यालय व्यापारी संकुलाच्या मागे असल्याने या ठिकाणी रात्री परिसरातील नागरिक लघुशंकेसाठी येत असल्याने अत्यंत दुर्गंध या ठिकाणी पसरलेली असते त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे साप,विंचू,उंदीर यांच्यासह दुर्गंधीयुक्त वातावरणात कर्मचाऱ्यांना या ठिकाणी थांबावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य आणि जीवन धोक्यात आले आहे. तसेच अत्यंत खराब झालेले कार्यालय कधीही पडू शकते त्यामुळे हे कार्यालय लवकरात लवकर स्थलांतर करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.