Home क्राईम चोरीचा अनोखा फंडा अल्पवयीन मुलं घरात घुसून करतायेत चोरी.. आराधना स्टेट बँक...

चोरीचा अनोखा फंडा अल्पवयीन मुलं घरात घुसून करतायेत चोरी.. आराधना स्टेट बँक कॉलनीत घडला प्रकार..

अहिल्यानगर दिनांक २७ ऑक्टोबर

चोरीचा अजब फंडा सध्या सुरू झाला असून अल्पवयीन लहान मुलांकडून चोऱ्या करून घेतल्या जात असल्याचा प्रकार भुतकरवाडी परिसरातील आराधना स्टेट बँक कॉलनी परिसरात घडला आहे.

दुपारच्या वेळेस दार लोटून घरातील व्यक्ती झोपलेले असताना हळूच चोर पावलाने घरात घुसून चोरी करण्याचे प्रकार या परिसरात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका सीसीटीव्ही काही अल्पवयीन मुले कैद झाली होती. मात्र ही मुलं चोरी करणारे नसतील म्हणून या परिसरातील नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतरही अनेक चोऱ्या या परिसरात घडल्या असून या सर्व चोऱ्या अल्पवयीन मुलांकडून करून घेतल्या जात असल्याचे समोर आले आहे. दुपारच्या वेळेस बंद दरवाजे बघून या चोऱ्या होत आहेत. लहान मुलं समजून कोणी त्यांना हटकत नाही त्यामुळे याचा फायदा घेत सध्या लहान मुलांकडून चोरी करून घेणारी टोळी सध्या या परिसरात चोरी करत असल्याचा संशय आहे.

श्रीपाद दगडे यांच्या घरी अशाच प्रकारे दुपारच्या वेळेस चोरी झाली असून घरातील महिला दार लोटून आराम करत असताना काही अज्ञात अल्पवयीन मुलांनी घरातील वस्तू चोरून नेल्या याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी हवा तसा प्रतिसाद दिला नसल्याचेही श्रीपाद दगडे यांनी सांगितले आहे. चोरी करणारे अल्पवयीन मुल असल्यामुळे या मुलांकडे जास्त कोणी संशयाने पाहत नाही आणि त्यामुळे चोरी करण्याचे प्रकार या परिसरात वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात कोणी अनोळखी अल्पवयीन मुल फिरत असल्यास त्यांची चौकशी करून त्यांचे नाव गाव पत्ता नक्कीच विचारावे यातून एखादी टोळी पोलिसांना सापडू शकते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version