Home राजकारण महाविकास आघाडीमध्ये बिघाडी… उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या करणार उमेदवारी अर्ज...

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी… उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या करणार उमेदवारी अर्ज दाखल…

अहिल्यानगर दिनांक 27 ऑक्टोबर

नगर शहर मतदार संघ हा गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता शिवसेना फुटी नंतरही नगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहिली. तसेच अहमदनगर शहराचे तात्कालीन आमदार स्व. अनिल राठोड शेवटपर्यंत शिवसेने सोबतच होते त्यांच्यासोबत नगर शहर शिवसेना ही अखंडपणे गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेना पक्ष वाढवत होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये नगर शहर मतदार संघाची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे न जाता महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना नगर शहर मतदारसंघावर आपला भगवा झेंडा फडकवत असताना अचानकपणे महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे कशी गेली याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनेक जण उमेदवारीसाठी इच्छित होते मात्र त्यांच्यापैकी कोणाच्याही एकाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास सर्वजण मिळून त्यांचे काम करण्याचा ठरावही करण्यात आला होता. आता ही जागाच मिळाली नसल्याने शिवसैनिक आणि पदाधिकारी नाराज झाले असून आज हॉटेल यश ग्रँड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जो अन्याय शिवसैनिकांवर झालाय तो मोडून काढून शिवसैनिक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असतात असा संदेश देत मंगळवारी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच जर पक्षाने निर्णय फिरवला नाही तर अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असून यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतही अनेक वक्त्यांनी आरोप करून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्यामुळे अखेर शिवसैनिकांचा असंतोष बाहेर आला असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बैठकीस माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, माजी नगरसेवक योगीराज गाडे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, यांच्यासह शहरातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version