Homeशहरनायलॉन चायना मांज्या विक्री करणा-यावर तोफखाना पोलीस स्टेशनने केली कारवाई 94,400/- रु...

नायलॉन चायना मांज्या विक्री करणा-यावर तोफखाना पोलीस स्टेशनने केली कारवाई 94,400/- रु मुद्देमाल जप्त

advertisement

अहमदनगर दि.१४ जानेवारी

तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महाराष्ट्रात राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी व प्राणी व मानवी जिवितास इजा करणारा नायलॉन चायना मांज्या विक्री करणा-या इसमांविरुध्द छापा टाकुन कारवाई करण्यात आली.तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी सचिन रणशेवरे यांच्या पथकाने ल तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 छापे टाकुन 94,400/- रु किं.चा मुद्देमाल त्यामध्ये 21,400/- रु किं.च्या 21 नायलॉन चायना मांज्याच्या रिळी, 3000/- रु किं.ची एक मांज्या पलटी करण्याचे इलेक्ट्रिक मोटर बसवलेले लोखंडी मशिन व 70,000/- रु किं.ची एक काळ्या रंगाची ऍ़क्सेस स्कुटी जप्त केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर श.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,नगर शहर विभाग, हरिष खेडकर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पो.उप.नि. सचिन रणशेवरे , पोहेकॉ/ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, पो.ना संदिप धामणे, वसिम पठाण, पो.कॉ सुमित गवळी, सतिष त्रिभुवन , शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे सर्व नेम-तोफखाना पो.स्टे.अ.नगर अशांनी केली आहे.

-: पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आव्हान :-
नागरिकांनी नायलॉन मांज्याचा वापर करु नये त्यामुळे मानवी जिवितास तसेच पक्षांना, प्राण्यांना तिव्र इजा होण्याची दाट शक्यात आहे. तसेच अशा प्रकारच्या मांजाचा वापर केल्यामुळे गंभीर स्वरुपाचा अपघात घडुन मानवी जिवितास हानी पोहचु शकते त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करु नये.तसेच कोठे नायलॉन मांज्याची विक्री होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आव्हान केलेले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular