Homeशहरगृहमंत्री साहेब शहर वाहतूक शाखेचे नाव बदलून महामार्ग चौक दंड वसुली शाखा...

गृहमंत्री साहेब शहर वाहतूक शाखेचे नाव बदलून महामार्ग चौक दंड वसुली शाखा असेच करा… शहरातील नागरिकांना शहर वाहतूक शाखेचा काही उपयोगच नाही ! बेशिस्त वाहतूक आणि बेशिस्त पार्किंग मुळे नागरिक हैराण…

advertisement

अहमदनगर दिनांक २४ डिसेंबर

अहमदनगर शहरात पत्रकार चौक या ठिकाणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे मुख्य कार्यालय आहे. मात्र या कार्यालयाच्या बाहेरच रोज बेशिस्त वाहतूक सुरू असते याकडेच या शाखेचे लक्ष नाही विशेष म्हणजे हा चौक मनमाड ,औरंगाबाद, सोलापूर, पुणे अशा रोडला जोडणारा चौक असताना या चौकात वाहतूक पोलीस नागरिकांना कधीच नजरेस पडला नाही.मात्र ठराविक वेळेस दंडाची पावती फाडताना चार-पाच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कधीमधी दिसत असतात शहर वाहतुकीच्या समोरच रिक्षावाल्यांचा थांबा आहे. त्यामुळे डीएसपी चौकाकडून शहरात जाणाऱ्या लोकांचे अनेक वेळा अपघात होतात मात्र शहर वाहतुके शाखेच्या समोरच रिक्षावाले रिक्षा स्टॉप असल्यासारखं नेहमीच उभा राहण्याचे चित्र नगरकर पाहत आहेत मात्र थेट शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर बेशिस्त वाहतूक होत असताना शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.

शहर वाहतूक शाखेचे काम फक्त नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या चौकातच असल्यासारखं काम पोलीस करत आहेत. डीएसपी चौक, चांदणी चौक आणि माळीवाडा बस स्थानका शेजारील इंपिरियल चौक या ठिकाणी पोलीस रोजच कार्यरत असतात मात्र या पोलिसांचे लक्ष फक्त दंडाची पावती कशी फाटेल याकडेच असते तर रोजच नागरिकांना अडचणीचा असणाऱ्या नेहमीच वाहतुकीचे कोंडी होणाऱ्या पोस्ट ऑफिस एसबीआय चौक, राज चेंबर चौक, प्रेमदान चौक, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा नेपती चौक,माळीवाडा वेस,कापड बाजार या ठिकाणी पोलीस शोधूनही सापडत नाही.

अहमदनगर शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षाने रस्त्यावर होणारे अतिक्रमण त्यानंतर रस्त्यावर लागणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहने आणि त्यातून मार्ग काढून नागरिकांना चालत जावे लागते. त्यामुळे दोन्ही प्रशासन झोपा काढत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेचे रोड म्हणजे स्वतःचे प्रॉपर्टी असल्यासारखे काही नागरिक आणि दुकानदार याचा उपयोग करत आहेत आपले स्वतःचे दुकान सोडून रस्त्यावर जास्तीत जास्त पुढे कसे जाता येईल याची स्पर्धा अहमदनगर शहरात लागलेली आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत चाललेले आहेत तर विशिष्ट वाहन पार्किंग मुळे शहरातील रस्ते अजूनच अरुंद झालेले आहेत ठिकठिकाणी रोडवरच गॅरेज सुरू आहेत विविध वस्तू विक्रेतेही रस्त्यावरच आपले ठाण मांडून बसलेले आहेत. बंद गाड्या आणि टायरचे दुकानदार आहे टाकून व्यवसाय करत असल्याचे चित्र नगर शहरात दिसून आहे कार सजावट ही रस्त्यावरच होतात. अत्यंत भकास आणि बकाल वातावरणात नागरिकांना कसाबसा रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे.

नगर शहरातील अनेक मुख्य चौक असलेल्या भागात रस्त्यावरच खाद्यपदार्थांच्या गाड्या लागल्यामुळे रोजच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्याला समोर जावे लागतेय.चौपटी करांजावर तर दिवसभर ट्राफिक जाम असते या ठिकाणी रोडवरच खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यानंतर होणारी पार्किंग यामुळे रस्ता क्वचित दिसून येतो त्याचप्रमाणे दिल्लीगेट प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग चौक,एकविरा चौक, प्रेमदान चौक या ठिकाणीही अशाच प्रकारे रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्या लावून त्यापुढे पार्किंग झाल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते तर प्रेमदान चौकातील एका पानाच्या दुकानासमोरच वाहनांच्या पार्किंगमुळे चोवीस तास या ठिकाणी ट्राफिक जाम असते. तर झोपडी कॅन्टीन परिसरात रस्त्यावरच कार सजावट होत असल्यामुळे या ठिकाणी रोजच ट्राफिक जाम होते या ठिकाणी शहर वाहतूक पोलीस नेहमी ये जा करत असतात मात्र या कार सजावट दुकानदाराकडे दुर्लक्ष का होते हे समजायला तयार नाही. मात्र याकडे वाहतूक शाखा पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे वाहतूक शाप हा झोपेचे सोंग घेते ती खरच झोपलेली आहे हेही कळत नाही.

वाहतूक शाखेचे अधिकारी नगरकरांना ही माहित नाही त्यामुळे शाखेच्या कर्मचाऱ्यांना तरी अधिकारी माहित आहेत का हा प्रश्न आता समोर येतोय. वाहतूक शाखेने किमान शहरात रोज पेट्रोलिंग जरी केली तरी नागरिक थोडेफार घाबरतील मात्र शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि अधिकारी कधीच शहरात फिरताना दिसले नाही हे विशेष त्यामुळे त्या शाखेचे नाव शहर वाहतूक शाखा बदलून महामार्ग चौक दंड वसुली शाखा असेच करावे अशी उपरोधित मागणी आता पुढे येऊ लागली आहे. कारण हे पोलीस फक्त महामार्गावरील काही ठराविक चौकातच दिसून येतात त्यामुळे ही मागणी पुढे येत आहे.

तर अहमदनगर शहरातील अनेक मोठमोठ्या इमारतींना पार्किंगच नसल्यामुळे ही सर्व पार्किंग रस्त्यावरच होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होती महानगरपालिकेचाही मोठा हात या वाहतूक कोंडीला असून महानगरपालिका ही झोपेतच आहे.अनेक मोठ्य इमारतींची पार्किंग कुठे हरवली आहे हेही आता शोधावे लागेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular