अहमदनगर दि.२४ डिसेंबर
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड भागात गेल्या दीड वर्षांपासून रस्त्यावर लाईट नसल्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वात मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे गुलमोहर रोड परिसरात लाईट नसल्यामुळे या परिसरातून अनेक वेळा महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचबरोबर रात्री टवाळ पोरांमुळे महिलांना मुलींना येण्या जाण्यास भीती वाटते तर ज्येष्ठ नागरिकांनाही अंधारातून फिरायला जावे लागत असल्यामुळे अनेक नागरिक आता गुलमोहर रोड परिसरात फिरायला येत नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून गुलमोहर रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासी गुलमोहर रोडवर खांब बसवून लाईट बसवाव्यात अशी मागणी करत आहेत. मात्र महानगरपालिका प्रशासनाने या नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. गुलमोहर रोड हा मॉडेल रोड होणार म्हणून काही दिवसांपूर्वी घोषणा झाली त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण झाले मात्र हे कामही अद्याप अर्धवट असून गेल्या दीड वर्षांपासून जे लाईटचे खांब काढून टाकले आहेत ते बसवले गेले नसल्यामुळे या भागात लाईटच लागलेली नाही महानगरपालिका आणि ठेकेदार यांच्या विसंवादामुळे गुलमोहर रोड अंधारात असून या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी टेंभा मिरवणूक काढून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे गुलमोहर रोड परिसरात नागरिकांनी टेंभा मिरवणूक काढून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. अंधार हटवा लाईट लावा. अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनात नगरसेवक रामदास आंधळे,बाळासाहेब सोनवणे, शिरीष जानवे ,कुमार नवले, एडवोकेट लक्ष्मीकांत पटारे, आकाश सोनवणे, मनोहर भाकरे, महेश घावटे, कौशिक रसाळ, महेश कुलकर्णी, प्रदीप घोडके, राहुल आंधळे ,प्रमोद कुलकर्णी, अविनाश बडे ,किशोर उबाळे,सांगळे साहेब, रमेश सोनवणे, आधी नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.