दिल्ली दि.११ जुलै
महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणारी राजकीय पेच असलेली याचिका अखेर कोर्टात लिस्ट झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी सुनावणी होणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यासोबत आमदारांचं निलंबन, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव, यासह अनेक राजकीय गुंतागुंतीच्या जटील प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे.
याआधी ११ जुलैची म्हणजेची आजची तारीख देण्यात आली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात लिस्ट न झाल्यानं आज सुनावणी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आता राजकीय पेचाचं हे प्रकरणी सुप्रीम कोर्टात लिस्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.