HomeUncategorizedमराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सरकारमध्ये असून सुद्धा सरकार विरोधात भूमिका...

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सरकारमध्ये असून सुद्धा सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागेल -आमदार संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.१३ सप्टेंबर

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी अहमदनगरच्या कायनेटिक चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा तरुणांनी सहभाग घेतला एक मराठा ‘लाख मराठा आरक्षण’ ‘आमच्या हक्काचं’ अशा घोषणा देत तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील सहभाग नोंदवत मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका मांडली जरी आम्ही सत्तेत असलो तरी मराठा समाजाबाबत आमच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं वक्तव्य यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी केलं.

सकल मराठा सामजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शांतपणे आंदोलन केले यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते अनिल शिंदे, यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली. शहरातील मराठा समाजाचे विविध मान्यवर या रस्ता रोको साठी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular