Home क्राईम जिल्हाधिकारी कार्यालयात लाचेचा सापळा यशस्वी

जिल्हाधिकारी कार्यालयात लाचेचा सापळा यशस्वी

अहमदनगर दि ४ जुलै
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूसंपादन कार्यातील मंगेश ढुमणे या कर्मचाऱ्याला चार हजारांची  लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

 

तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगीकरता ना हरकत प्रमाणपत्रासाठी भुसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते. सदरचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोपी ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. दि. १ जुलै रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणीदरम्यान आरोपी ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते. सोमवारी चार हजार रुपये घेताना  आरोपी ढुमणेला  पकडण्यात आले.

लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, गहिनीनाथ गमे, पोना. रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, मपोना. राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार हरून शेख, राहुल डोळसे यांनी ही कारवाई केली.

 

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version