Home राजकारण शिवसेनेची आमदार फुटी काही थांबेना विश्वासदर्शक ठरावा आधी आणखी आमदार शिंदे गटात

शिवसेनेची आमदार फुटी काही थांबेना विश्वासदर्शक ठरावा आधी आणखी आमदार शिंदे गटात

मुंबई दि.४ जुलै

शिवसेनेला रोज एक नवीन धक्का बसत असून आमदारांना थांबवण्यासाठी शिवसेनेमधून कितीही प्रयत्न झाले असले तरी रोज कोणी ना कोणी पदाधिकारी बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी मुंबई येथे बहुमत चाचणीच्या आधीच शिवसेनेला पुन्हा एक धक्का बसला असून ठाकरे समर्थक आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याची माहिती मिळते आहे.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 15 समर्थक आमदार उरले आहेत शिवसेनेचे संतोष बांगर हे हिंगोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. कालपर्यंत ते उद्धव ठाकरे यांच्या गोटामध्ये सामील होते मात्र विश्वास दर्शक ठरावाच्या आधीच संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आमदार झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version